Street lights on national highways off, accidents due to fog
शहागड, पुढारी वृत्तसेवा अंबड तालुक्यातील शहागड येथून जाणाऱ्या सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या उड्डाण पुलावरील दोन्ही साईटचे पथदिवे बंद आहे. महामार्गवरील दाट धुके व बंद पथदिव्यामुळे अपघात वाढले आहे. पथदिवे सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फक्त करणे सांगून दरवर्षी टाळा-टाळ करत वेळ मारुन नेत आहे. यामुळे ट्रक, कार चालक, वाहनधारकांना आपल्या जीवाला मुकावे लागत असून दरवर्षी हिवाळ्यात या भागात गोदावरी नदीमुळे दाट धुक्याचे सावट असते.
यामुळे दरवर्षी अपघातात बडीग्रोद्री उड्डाण पुल, गोदावरी नदी उड्डान पुल, कारखाना उड्डान पुलावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. पथ दिवे बसणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट दाराला कॉन्ट्रॅक्ट देताना काही नियम व अटी टाकलेल्या असतांत कॉन्ट्रॅक्ट घेतानाच पाच ते दहा वर्ष देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित कॉन्ट्रॅक्टदार व त्यांला कॉन्ट्रॅक्ट देणारी अधिकारी सुपरवायझर यांचे असते. परंतु असे होतांना याठिकाणी दिसत नाही.
राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या सर्व पथदिव्यांना विद्युत दाब कमी असून, शहागड भागात शेती उद्योग आणि पथदिव्यांचा विद्युत पुरवठा एकाच असल्याने वारंवार लाईट ट्रिप होने, कमी दाब व महामार्ग प्राधिकरणचे स्वातंत्र रोहित्र नसणे, किंवा त्यांना जागा उपलब्ध असतानाही, जागा उपलब्ध नाही. म्हणत, नवीन रोहित्र न बसवणे, खाजगी लाईनमन ( पथदिव्याच्या इंजिनीयर आणून त्याला बरीच वायरिंग असल्याने त्यांला या वावरिंग चा फॉल्ट न निघणे, वायरींगमध्ये पावसाचे पाणी व अनेक ठिकाणी महामार्गाच्या खाली वायरींग दावलेली व बऱ्याच ठिकाणी अपघात होऊन पथदिव्याचे एलईडी लाईट बल्ब पडून खांबे वाकल्याने, तसेच काही एलईडी पथदिवे बल्ब खराब बंद पडल्याने त्यांची दुरुस्ती होत नसल्याने पथदिवे महामार्गाचे बंद आहेत. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने दाट धोक्यामुळे महामार्गावरील पथदिवे रात्री व सकाळी आठ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मागणी वाहनधारकांसह अंबड तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.