जालना : काढणीस आलेल्या खरीप पिकावर पावसाचा घाला; शेतकरी अडचणीत  pudhari photo
जालना

जालना : काढणीस आलेल्या खरीप पिकावर पावसाचा घाला; शेतकरी अडचणीत

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासुन पडणाऱ्या पावसामुळे शेतात ऋढुन ठेवलेल्या सोयाबीन, मुग, उडीद, मकासह इतर पिकांचे आतोनात नुक्सान झाले. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कापुन ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यात २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान पुन्हा यलो अलर्टचा इशारा दिल्याने शेतकरी धास्तावला आहे. जालना जिल्ह्यात पावसाची सरासरी ६०३ मीमी असुन आजपर्यंत ७६० मोमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षीक सरासरीच्या १३२ टक्के आहे. गेल्या काही दिवसापासुन पावसाचा जोर वाढल्याने शेतात काढुन ठेवलेले सोयाबीन, मुग, मका व उडीद पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जालना, अंबड, बदनापुर व घनसावंगी तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. तुलनेत भोकरदन व जाफराबाद तालुक्यात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे.

जालना तालुक्यात मंगळवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासात १७ मोमी तर जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत चोवीस तासात ६ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांच्य हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यांमधे चिंतेचे सावट पसरले आहे. सोयाबीन भिजल्याने एकीकडे उत्पादनात घट होणार असतांनाच दुसरीकडे दर्जाही घसरणार असल्याने भावातही मोठी घट होणार आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन शेंगा पावसामुळे फुटुन मातीत सोयाबीन गेले आहे.

सरासरी ओलांडली

जिल्ह्यात आजपर्यंत ७६० मीमी पाऊस पडला असून त्यात जालना ७९४, बदनापुर ७०९, भोकरदन ७०४, नाफराबाद ६६८, परतुर ७४७, मंठा ८३०, अंबड ७७१, पनसावंगी ८४२ मीमी पावसाची नोंद झाली आहे.

यलो अलर्ट

जिल्ह्यात २३ ते २६ सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे शेतात काढणी करुन ठेवलेल्या सोयाबीन गोळा करुन त्याच्या गंजा घालणे पाऊस व चिखलामुळे अवघड बनले आहे. पुन्हा पाऊस येणार असल्याने शेतकरी कापणी करुन ठेवलेले सोयाबीन वाचविण्यासाठी धावपळ करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT