भोकरदन, पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शोले स्टाईल जलकुंभावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला काहीअंशी प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला असून आंदोलनातील काही मागण्यांवर तत्काळ कारवाईला सुरुवात झाली आहे.
भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग बांधवांना मानधन, प्रधानमंत्री किसान सम्मान योजना, जालना येथून रात्री ७:३० नंतर बस नसल्याने रात्री ८:३० वाजता जालना ते भोकरदन बस सुरू करणे, आलापूर ते वाडी खुर्द रस्ता, पेरजपूर ते भोकरदन रस्ता, भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना नवीन शिधा पत्रिका तत्काळ देणे, शेतकरी बांधवांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, भोकरदन शहराला खडकपूर्ण येथून शुद्ध पाणी पुरवठा करणे यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे.
यापैकी शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात कन्या भोकरदन या शाळेपासून सुरुवात झाली आहे. जालना ते भोकरदन रात्री ८:३० वाजेची वस सुरू करण्यात आली आहे. कृषी अधिकारी कार्यालय भोकरदन येथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना साठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे याप्रमाणे काही मागण्यांना मंजुरी मिळाली असून तहसीलदार यांनी भेट दिली, परंतु काही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार आहे.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, तालुकाप्रमुख कैलास पुंगले, नवनाथ दौड, शहरप्रमुख महेश पुरोहित, उपतालुकप्रमुख गणेश फुसे, नाना सहाणे, संतोष सुरडकर, प्रदीप पैठणकर, संदीप लाड, प्रकाश पाटील, पिराजी जाधव, सुरेश कचके, बाबुराव काकफळे, बाळासाहेब जाधव, संदीप क्षीरसागर, शे. मतीन भाई, शेख खालेद, कमलबाई पवार, लक्ष्मीबाई टोम्पे, लताबाई हिवाळे, लिलाबाई गंगावणे, कौसबाई गंगावणे, सखुबाई हिवाळे, चतुराबाई टोम्पे, अन्साबाई ढाकणे, इंदूबाई भालेराव, साखराबाई गंगावणे, रतुबई ठोंबरे, लिलाबाई मोरे, लक्ष्मीबाई टोम्पे, राहीबाई टोम्पे, प्रल्हाद गंगावणे, अरुण काकफळे, शेख याकूब, रामेश्वर देशमुख, संतोष सुसर, गोलू दांडगे, यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.