Dr. Shrikant Shinde : जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सज्ज राहावे file photo
जालना

Dr. Shrikant Shinde : जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सज्ज राहावे

जालना : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sainiks in the district should remain prepared to hoist the saffron flag over the Zilla Parishad.

जालना, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना संसदीय पक्षाचे नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जालना जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला आतापासूनच लागण्याचे निर्देश दिले. जालना जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मराठवाडा दौऱ्यादरम्यान खासदार डॉ. शिंदे यांनी जालना, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी आणि परतूर विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यावेळी खासदार संदीपान भुमरे, मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर, आमदार अब्दुल सत्तार, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, मराठवाड्यातील जनता शिवसेनेसोबत आहे. मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी मोठा निधी आणि विविध योजना दिल्या.

कार्यकर्त्यांनी बूथस्तरावर संघटना मजबूत करण्यासोबतच मतदार यादी पडताळणीवर विशेष भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. घनसावंगी येथे झालेल्या बैठकीतही डॉ. शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाभरातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.

डॉ. श्रीकांत शिंदे तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मराठवाड्याच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून या काळात ते जालना, नांदेड, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT