Sarpanch and Upsarpanch's honorarium doubled
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: गावाचा कारभार सांभाळणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना फक्त नावापुरते अधिकार राहिले आहेत. राज्य सरकारने सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन गेल्या वर्षी दुप्पट केले असले, तरी सामान्य ग्रामपंचायत सदस्यांना आजही एका सरपंच, बैठकीसाठी केवळ २०० रुपयेच भत्ता मिळतो, तोही अनेक ग्रा.पं. मधे वर्षानुवर्षे मिळालेला नाही. त्यामुळे म्हणायला गावाचे पुढारी पण कवडीचा फायदा नाही, अशी गत सदस्यांची झाली आहे. भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यामधे यामुळे नाराजी व्यक्त होत असून आपल्यालाही किमान सन्मानानजनक भत्ता द्यावा, अशी मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
पंचायतराज व्यवस्थेचा पाया असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना महिन्याला फक्त २०० रुपये भत्ता मिळतो. त्यामळे ग्रामीण विकासात महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तींकडेच दुर्लक्ष होत आहे. शासनाने सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात दुपटीने वाढ केली असताना ग्रा.पं. सदस्यांचे भत्त्यांमधे अद्याप वाढ न झाल्याने सदस्य दुर्लक्षित राहिले आहेत. त्यामुळे अत्यल्प भत्ता घेउन गावचा विकास कसा करणार असा प्रश्न सदस्य विचारत आहेत. महापौर, नगरसेवक जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य आणि सरपंचांना महिन्याकाठी मानधन दिले जाते, काहींना बऱ्यापैकी पैसे मिळतात तर काहींना अगदी तुटपुंजी रक्कम मिळते. त्यामुळे आता सदस्यांनाही सन्मानजनक भत्ता द्यावा, अशी मागणी ग्रा.पं. सदस्यांतून होत आहे.
सरकारने सरपंच, उपसरपंचांना वाढीव मानधन देण्याचा सप्टेंबर २०२४ मध्ये शासन निर्णय घेतला. मात्र, त्या निर्णयाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान, सदस्यांनाही उपस्थिती भत्ता म्हणून अगदीच अल्प पानधन दिल्या जाते. त्यांचा भत्ता वाढविणेही गरजेचे आहे.मुदसर पठाण, ग्रामपंचायत सदस्य वाकडी
राज्य शासनाने २०२४ मध्ये सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करत मोठा निर्णय घेतला. मात्र, त्यात सदस्यांचा विचारच केलेला नाही.कैलास खंडेलवाल, ग्रामपंचायत सदस्य आन्वा