भोकरदन : एका बाजूला राज्य सरकार ३०० कोटी वृक्ष लागवडीचे जंगी उद्दिष्ट जाहीर करते, तर दुसऱ्या बाजूला वृक्षतोडीच्या अटी ११ वरून थेट ५ वर आणून लाकूडतस्करांचे रस्ते मोकळे केले जातात, हा सरकारचा मोठा विरोधाभास आहे. या नियमांच्या शिथिलतेचा गैरफायदा घेऊन जालना जिल्हा आणि भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील वनसंपदा नष्ट केली जात असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांनी विधानसभेत केला. मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मतदारसंघातील अवैध वृक्षतोडीच्या गंभीर मुद्द्यावर त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
या संदर्भात बोलताना त्यांनी वन अधिकारी आणि लाकूड व्यापाऱ्यांमधील संगनमताचा थेट पर्दाफाश केला. गेल्या एप्रिल-मे महिन्यात स्वतः वन अधिकाऱ्यांना लाकडाने भरलेले २० ते २५ अवैध ट्रॅक्टर्स पकडून दिल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
हे लाकूडतस्कर कारवाई टाळण्यासाठी गाड्यांच्या बाहेरच्या बाजूला सुबाभूळ किंवा निलगिरीसारखी परवानगी असलेली कायदेशीर लाकडं लावतात आणि आतल्या बाजूला वनक्षेत्रातील मौल्यवान झाडांची छुप्या पद्धतीने तस्करी करतात, अशी तस्करांची नवी कार्यपद्धतीच (मोडस ऑपेरंडी) त्यांनी समोर आणली.
विदर्भाच्या हद्दीत जंगल, मराठवाड्यात शिरताच गायब "आमच्या मतदारसंघाला लागूनच असलेल्या विदर्भाच्या हद्दीत दाट जंगल दिसते, पण मराठवाड्याच्या हद्दीत पाय ठेवताच जंगल गायब होते; हा वन अधिकारी आणि लाकूड व्यापाऱ्यांमधील संगनमताचा थेट पुरावा आहे," अशा अत्यंत कडक शब्दांत त्यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले. आज अत्याधुनिक इलेक्ट्रिक कटरमुळे अवघ्या ५ मिनिटांत भलीमोठी झाडे जमीनदोस्त केली जात असून वनसंपदा धोक्यात आल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
मंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आश्वासन
या अवैध वृक्षतोडीच्या गंभीर मुद्द्यावर त्यांनी सभागृहात माननीय वनमंत्र्यांना थेट प्रश्न विचारून यास जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी व लाकूड व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार का? अशी विचारणा केली. या प्रश्नाला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित दोषी अधिकारी व लाकूड व्यापाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कडक कार्यवाही करण्याचे ठोस आश्वासन माननीय मंत्र्यांनी यावेळी सभागृहात दिले.
विदर्भाच्या हद्दीत जंगल, मराठवाड्यात शिरताच गायब
"आमच्या मतदारसंघाला लागूनच असलेल्या विदर्भाच्या हद्दीत दाट जंगल दिसते, पण मराठवाड्याच्या हद्दीत पाय ठेवताच जंगल गायब होते; हा वन अधिकारी आणि लाकूड व्यापाऱ्यांमधील संगनमताचा थेट पुरावा आहे," अशा अत्यंत कडक शब्दांत त्यांनी प्रशासकीय ढिसाळपणावर बोट ठेवले. आज अत्याधुनिक इलेक्ट्रिक कटरमुळे अवघ्या ५ मिनिटांत भलीमोठी झाडे जमीनदोस्त केली जात असून वनसंपदा धोक्यात आल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.