Accident  Pudhari
जालना

Samruddhi Expressway Accident | जालन्याजवळ भरधाव ट्रकची कामगारांच्या वाहनाला धडक; ६ जणांचा मृत्यू, तीन जखमी

जालना येथील रुग्णालयात जखमींवर उपचार

पुढारी वृत्तसेवा

Samruddhi Mahamarg Truck Workers vehicle collision

जालना : समृद्धी महामार्गावर जालन्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरहून मुंबईकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT