Reservation for the post of chairman of 3 municipalities and 5 Nagar Panchayats in Jalna district has been announced.
संघपाल वाहुळकर
जालना : जालना जिल्ह्यातील ३ नगरपालिका आणि ५ नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाचे आरक्षण सोमवार (६) रोजी जाहीर झाले. जाहीर झालेल्या आरक्षणात महिलांचा वरचष्मा दिसून येत आहे.
आरक्षणाचा बिगुल वाजताच आता राजकीय पक्षांकडून सत्ता संतुलनाचा खेळ सुरू झाला आहे. आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बहुतांश नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. मात्र, नगरपालिका, नगर पंचायती आरक्षित झाल्यामुळे या नेतेमंडळीतून कहीं खुशी कहीं गमचा सूर उमटत आहे.
जालना जिल्ह्यातील ३ नगर परिषद आणि ५ नगर पंचायतींसाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या आर क्षणाच्या यादीनुसार अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परतूर नगर परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परतूर शहरातील आर-क्षणाच्या या नव्या फेरबदलानंतर येथील अनेक जुन्या दावेदारांच्या समीकरणांमध्ये बदल होणार आहे. आरक्षणानंतर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
निर्णयानंतर अनेक महिला नेत्यांमध्ये उत्सुकता अंबड नगरपालिकेचे अध्यक्षपद सर्वसाध ारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. अंबड शहरात गेल्या काही वर्षांत महिलांचा राजकीय सहभाग वाढत असल्याने या निर्माण झाली आहे. भोकरदन नगर परिषद अध्यक्षपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मागील काही निवडणुकांत येथील राजकारणात महिलांचा प्रभाव वाढत चालला असून, आता ओबीसी महिलांना संधी मिळाल्याने स्थानिक राजकारणात नवा उत्साह दिसून येत आहे.
बदनापूर नगर पंचायत अध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी राखीव असल्याने येथील सर्व राजकीय पक्षांमध्ये पुरुष उमेदवारांची चुरस वाढण्याची शक्यता आहे. घनसावंगी नगर पंचायत अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी, तर मंठा नगर पंचायत अध्यक्षपद ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील या दोन ठिकाणी आरक्षणाचा निर्णय स्थानिक पातळीवर मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.
जाफराबाद नगर परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी, आणि तीर्थपुरी नगर पंचायत अध्यक्षपद ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या जाहीर झालेल्या आरक्षणानंतर सर्वच नगर परिषद व नगर पंचायतींमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षीय स्तरावर संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी दावेदार आपल्या पक्षीय नेत्यांकडे संपर्क साधणार असून, पुढील काही दिवसांत स्थानिक राजकीय समीकरणात मोठे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. नव्या आरक्षणानंतर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक रंगतदार होणार आहे.
युती व आघाडीबाबत सांशकता
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका युती व आघाडी अशा लढल्या जाणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढून आपले पक्षीय बलाबल तपासणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. युती व आघाडी झाल्यास अनेक इच्छुक अपक्ष अथवा इतर पक्षांची वाट धरणार असल्याची चर्चा आहे.