Republican Sena Condemns Statement by Social Justice Minister Shirsat
जालना, पुढारी वृत्तसेवा : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत अॅट्रॉसिटी - कायद्याबाबत केलेल्या वक्तव्याचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र निषेध - व्यक्त करण्यात आला आहे. - यासंदर्भात जिल्हाधिकारी - कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना - निवेदन देण्यात आले.
सेनेच्या रिपब्लिकन - पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात - म्हटले आहे की, अॅट्रॉसिटी कायद्यात तत्काळ अटक करू नये, आधी चौकशी करावी, असे विधान मंत्री शिरसाट यांनी केल्याने अनुसूचित जाती-जमाती समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात तत्काळ कारवाई करून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन, उपोषण व निदर्शन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहळकर, दिनेश आदमाने, मच्छिंद्र खरात, समाधान खरात, रंजीत माने, जितू उघडे, भीमराज खरात, संघर्ष पंडित, दिनेश वाहूळे, कांताबाई बोरुडे, सुनिता आखाडे, नवनाथ ठोके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.