Raosaheb Danve paid a courtesy visit to the residence of Mayor Chitra Pawar
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष चित्रा संतोष पवार यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी रविवारी, दि. ४ रोजी सदिच्छा भेट दिली.
यावेळी रावसाहेब दानवे यांनी नगराध्यक्ष चित्रा पवार यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. बदनापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीने लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासन राबवावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
मूलभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नगराध्यक्ष चित्रा पवार यांनीही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, हरिश्चंद्र शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान मात्रे, संतोष पवार, वसंतराव जगताप, गटनेते बाबासाहेब कऱ्हाळे, प्रदीप साबळे, समीर शेख, संदीप पवार, संतोष शिरसाठ, रघुनाथ होळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.