डोणगाव ः वासाडी (ता.कन्नड) येथील पंढरीनाथ निकम व त्यांच्या पत्नी निर्मला निकम या दांपत्यास पहिल्या दर्शनाचा मान देण्यात आला.  pudhari photo
जालना

Rajureshwar temple festival : लाखो भक्तांनी टेकला राजुरेश्वर चरणी माथा

अंगारकी चतुर्थी ः निकम दाम्पत्याला पहिला मान, रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

डोणगांव ः भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर येथे अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने लाखो भाविकांनी राजुरेश्वराच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले कडक उन्हाचा तडाखा असतानाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले. दिवसभर मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर रात्री उशिरापर्यंतही भाविकांची वर्दळ कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भारलेले वातावरण संपूर्ण परिसरात अनुभवायला मिळाले.

या पवित्र सोहळ्यात कन्नड तालुक्यातील वासाडी येथील पंढरीनाथ गजाबा निकम व त्यांच्या पत्नी निर्मला निकम या दांपत्यास पहिल्या दर्शनाचा मान देण्यात आला. गणपती संस्थानच्या वतीने त्यांचा श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, सावलीसाठी तात्पुरते शेड्स तसेच वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. सेवेकऱ्यांनी भाविकांना मदत केली.

चोख बंदोबस्त

संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाहतूक नियंत्रणासह मंदिर परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली राजुरेश्वर हे महाराष्ट्रातील प्रमुख श्रद्धास्थान असून दरवर्षी अंगारकी चतुर्थीला येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT