जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह तालुक्यात बुधवारी सकाळी अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले. शहरात अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने या पाण्यातून वाट काढताना बाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागला, काढणीस आलेल्या कापसाच्या पावसाने वाती झाल्या. अनेक ठिकाणी सोयाबीनचा भुसा, ज्वारीचा कडबा पावसाने भिजला. फुलोऱ्यात असलेल्या तुरीसह हरभरा पिकांवरही ढगाळ वातावरण व पावसामुळे किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळाले.
जालना शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास बेमौसमी पावसाचे आगमन झाले. सकाळी काही काळ पावसाचा जोर चांगला असल्याने शहरातील विविध रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांची पळापळ झाली. नवीन भोंडधात ग्रामीण भागातून आलेला शेतीमाल भिजू नये यासाठी अडत व्यापाऱ्यांची शेतीमाल झाकण्यासाठी धावपळ झाल्याचे दिसून आले.
शहरातील जुना जालना भागातील अमृतेश्वर मंदिर, टाऊन हॉल परिसरात पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागला. बुधवारी दिवसभर असलेल्या ढगाळ बातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. तालुक्यात काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. तुरीच्या कोवळ्या शेंगासह हरभप्याच्या पिकावर ढगाळ वातावरण व पावसामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
शहरात बुधवारी सकाळी पडलेल्या पावसानंतर काही भागातील बीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळीच वीज गेल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला, फैगल चक्रीवादळामूळे जिल्ह्यात पाऊस पडत असल्याचे तन्ज्ञांनी सांगितले.