Jalna Crime News : लालवाडी मार्गावरील खामगाव येथे अवैध देशी दारू विक्रीवर छापा file photo
जालना

Jalna Crime News : लालवाडी मार्गावरील खामगाव येथे अवैध देशी दारू विक्रीवर छापा

बदनापूर पोलिसांची कारवाई; १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Raid on Illegal Sale of Country Liquor at Khamgaon on Lalwadi Road

जालना, पुढारी वृत्तसेवा : खामगाव येथे खामगाव-लालवाडी रोडवरील एका पत्राच्या खोलीत छुप्या पद्धतीने अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर बदनापूर पोलिसांनी छापा मारला. त्याच्या ताब्यातून १८९ एमएलच्या १७ सीलबंद देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या.

ही कारवाई गुरुवार दि. २८ रोजी उशिरा करण्यात आली. बदनापूर पोलिसांनी सुरेश मदनसिंग खोकड (५५, रा. खामगाव, ता. बदनापूर) या असे अटक केले आहे- दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बदनापूर पोलिस ठाण्याचे पथक गुरुवारी (दि. २८) रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खामगाव येथे पत्राच्या खोलीत अवैध दारू विक्री सुरू असल्याची पक्की माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवार, दि. २८ रोजी रात्री २३:४० वाजेच्या सुमारास पंचांसह सदर ठिकाणी छापा मारला.

या छाप्यात एका खाकी रंगाच्या खोक्यात देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या १८० एम.एल.च्या १७ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी १ हजार ७०० रुपये किमतीचा हा दारूसाठा जप्त केला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल अब्दुल बारी अब्दुल अजीज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश खोकड याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बदनापूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात मोहीम उघडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT