अवैध दारू साठ्यावर धाड; ६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त file photo
जालना

अवैध दारू साठ्यावर धाड; ६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

बाळू बागरेवर गुन्हा दाखल; बोलेरोसह देशी-विदेशी दारू जप्त

पुढारी वृत्तसेवा

Raid on Illegal Liquor Stockpile; Contraband Worth ₹6.70 Lakh Seized

जालना, पुढारी वृत्तसेवा : अंबड राज्य उत्पादन शुल्कक्च्यावतीने अवैधरीत्या साठवून ठेवलेला देशी व विदेशी दारूवर करण्यात आली. त्यात ६ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरण संशयित आरोपी बाळूभाऊ बागरे (रा. चिंचोली, ता. अंबड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रवीण सुर्वे, तसेच विभागीय उपायुक्त संगीता देवकर-मंडल व अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यत आलेल्या या कारवाईत निरीक्षक पी. बी. ठाकूर व दुय्यम निरीक्षक एस. एस. पवार यांच्या पथकाने २५ मार्च २०२६ रोजी कंजारकी फाटा, कुंभार पिंपळगाव (ता. अंबड) येथे छापा टाकला.

या वेळी आरोपीकडून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो (क्रमांक एमएच-२० सीएफ ०१२४) वाहनातून देशी व विदेशी दारूचा अवैध साठा वाहतूक करून विक्रीसाठी ठेवलेला आढळला. जप्त केलेल्या मुद्देमालात १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या ४८ बाटल्यांचे ६ बॉक्स, विदेशी दारू (इम्पीरियल ब्लू, रॉयल स्टॅग) यांच्या ४८ बाटल्यांचे २ बॉक्स प्रत्येकी, तसेच ६५० मिली क्षमतेच्या बिअरच्या १२ बाटल्यांचा १ बॉक्स यांचा समावेश आहे.

सदर कारवाईत बोलेरो वाहनासह एकूण ६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ), ८०, ८३, ९० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक पी. बी. ठाकूर, दुय्यम निरीक्षक एस. एस. पवार, चालक दिनेश आभारे, जवान एस. एस. दुल्ला यांच्या पथकाने यशस्विरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT