जालना

जालना : शहागड, अंकुशनगरला ५०० च्या डुप्लीकेट नोटा चलनात

backup backup

शहागड; पुढारी वृत्तसेवा : अंबडमध्ये कित्येकदा व्यापाऱ्यांना पैशांच्या बंडल मध्ये ५०० च्या डुप्लीकेट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. एक व्यापारी व्यावसायिक बॅंकेत पैसे जमा करण्या करिता गेला असता सर्व नोटा डुप्लीकेट असल्याचे लक्षात आले.  सोमवारी मध्यरात्री पाचोड (ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) च्या पोलीस पथकाने शहागड (ता.अंबड) येथील सचिन मधुकर जाधव, व अप्पासाहेब पवार, अंकुश नगर येथील कुंदन सुधाकर जगताप तरुणाला ताब्यात घेतले, व त्यांच्या जवळील कार एम.एच.०४.जीएम.२५५२, ताब्यात घेतली असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पाचोड पोलिसांनी कुंदन जगताप याची झाडाझडती घेतली असता, ५०० रुपयच्या १३ बनावट नोटा आढळून आले. तसेच शहागड येथील सचिन जाधव याच्याकडे ५०० च्या ३१ बनावट नोटा मिळून आल्या आहेत. या नोटा अप्पासाहेब पवार यांच्याकडून घेतल्या असल्याचे त्याने सांगितले. तद्नंतर अप्पासाहेब पवार याच्या घराची झाडाझडती घेतली असता, तो पसार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT