Jalna News : गौसन्मानार्थ आज शहरात जनजागृती रॅली file photo
जालना

Jalna News : गौसन्मानार्थ आज शहरात जनजागृती रॅली

गौप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: अग्रवाल

पुढारी वृत्तसेवा

Public awareness rally in the city today to honor cows.

जालना, पुढारी वृत्तसेवाः संपूर्ण देशभरात गोहत्या पूर्णतः प्रतिबंधित करून गोमातेला पूर्ण संरक्षण मिळावे, गोमातेला 'राष्ट्रमाता', राष्ट्र आराध्या, या सन्मानित पदाचा दर्जा प्राप्त व्हावा तसेच संपूर्ण भारतवर्षात समान गोसेवा घडण्यासाठी स्वतंत्र केंद्रीय गोसेवा मंत्रालय स्थापन करून केंद्रीय कायदा लागू करण्यात यावा, या मागण्यांसाठी श्री गणेश महासंघ, अद्विक क्लब, रोटरी क्लब ऑफ जालना इलाईट आणि इनरव्हील क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (२०) रोजी सकाळी ६:३० वाजता 'गौसन्मान अभियान जनजागृती रॅली'चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष श्लोक जगदीश अग्रवाल व महासचिव भूषण पारसनंद यादव यांनी दिली.

ही जनजागृती रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जवाहर बागपर्यंत काढण्यात येणार आहे. रॅलीचा शुभारंभ प्रमुख मार्गदर्शक व युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या हस्ते होणार असून, यावेळी बाबा नंद, महासंघाचे माजी अध्यक्ष रोहित भुरेवाल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दुर्गेश कटोटीवाले, नगरसेवक दिनेश भगत आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या अभियानांतर्गत जनजागृती रॅलीदरम्यान गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांना स्वाक्षरी मोहिमेसाठी विशेष फॉर्म उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातही श्री गणेश महासंघातर्फे नागरिकांसाठी स्वाक्षरी स्टॉल उभारण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान तब्बल १ लाख नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करून ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.

या जनजागृती रॅलीत जालन्यातील गौप्रेमी, भाविक व नागरिकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष श्लोक अग्रवाल, महासचिव भूषण यादव, कार्याध्यक्ष अॅड. महेश धन्नावत, उपाध्यक्ष डॉ. शिवदत्त विजयसेनानी यांच्यासह महासंघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT