आक्षेपार्ह पोस्ट पोलिसांच्या रडारवर; व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनसह सदस्यांना पोलिसांचा इशारा  pudhari photo
जालना

आक्षेपार्ह पोस्ट पोलिसांच्या रडारवर; व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनसह सदस्यांना पोलिसांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वालसावंगी : कायदा व सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी पारध पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या सर्व नागरीकांनी सहकार्य करावे. व्हॉट्स अॅपसह सोशल मीडियावर आ- क्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर पोलिस प्रशासन कारवाई करणार असा इशारा पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी दिला.

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांसह व्हॉटस अॅपचे ग्रुप अॅडमिन व ग्रुप मधील सदस्यांना पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी दिलेल्या इशाऱ्यात म्हंटले आहे कि, जातीय तेढ निर्माण करून वादाचे प्रकार घडविणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्यास तसेच कायद्यांचे उल्लंघन करून सोशल मीडिया वर जातीय वाद निर्माण केल्यास कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्यासह भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे व सायबर सेल कडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-यांवर सायबर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावून तेढ निर्माण होईल असे मेसेज, पोस्ट शेअर अथवा स्टेटसला ठेवू नये. एखादी आक्षेपार्ह पोस्ट किंवा कृत्यामुळे गुन्हा दाखल होऊन त्याचा परिणाम युवकांच्या भविष्यावर होऊ शकतो. येत्या नवरात्र उत्सवाच्या काळात सण उत्सवात कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. ग्रुप अॅडमिनने ओन्ली एडमिन ग्रुप अशी सेटिंग करावी अशा सुचना के ल्या आहेत.

सोशल मीडियाचा जपून वापर करा

नागरिकांनी सोशल मीडियाचा जपून वापर करावा तसेच सामाजिक सलोखा राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT