जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात स्थानिक गुन्हा शाखा व गोंदी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन तलवारी जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी दोन जणांना जेरबंद करण्यात आले आहे.
गोकुळवाडी येथील धारदार तलवारी बाळणाऱ्या इसमास जेरबंद करून दोन तलवारी केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना तालुक्यातील गोकुळवाडी येथील अरविंद रमेश पवार हा तलवारी बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी त्याच्या घराजवळून ४ हजार ५०० रुपयांच्या दोन धारदार तलवार जप्त केल्या. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदी पोलिसांनी केलेल्या दुसऱ्या कारवाईत अंबड तालुक्यातील महाकाळा येथील रामेश्वर ऊर्फ बंडू वाघमारे याच्या ताब्यातुन स्टीलची गंज चढलेली जप्त केली. या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरासह जिल्ह्यात मोठ्या संख्येने तलवारीसह इतर शस्त्र मिळून येत आहेत.