Police response time is 6.9 seconds for incidents involving women, and 6.10 seconds for accidents!
संघपाल वाहूळकर
जालना : जालना जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरत असलेल्या 'डायल ११२' या आपत्कालीन यंत्रणेने अल्पावधीतच नागरिकांचा मोठा विश्वास संपादन केला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८ हजारांहून अधिक घटनांची नोंद या प्रणालीवर झाली असून, पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ अवघ्या ७ मिनिटांचा राहिला आहे. यामुळे डायल ११२ आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, जालना पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 'डायल ११२' वर विविध प्रकारच्या मदतीसाठी नागरिकांचे कॉल आले आहेत. गुन्हेगारी, महिला संबंधित, माहितीविषयक, चौकशी विषयक, तणाव व मदतीसंबंधित आदींसह इतर कॉल आले आहेत. जालना पोलिसांच्यावतीने आलेल्या कॉल्सना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे नागरिकांचा' डायल ११२' वर विश्वास बसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलासंबंधित कॉल्स आल्यानंतर ६ मिनिटे ९ सेकंदात प्रतिसाद देण्यात आला आहे. रस्ते अपघाताच्या कॉल्सवर सरासरी ६ मिनिटे १० सेकंद इका वेळ प्रतिसाद देण्यासाठी लागला आहे.
खोटे कॉल करू नका
अनेकदा खोटे, दिशाभूल करणारे आणि विनाकारण कॉल केल्यामुळे पोलिसांचा महत्त्वाचा वेळ व मनुष्यबळ वाया जाते, ज्यामुळे खऱ्या मदतीची गरज असलेल्या नागरिकांना सेवा देण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे परिस्थितीत न घाबरता 'डायल ११२' चा वापर केवळ वास्तविक गरजेच्या वेळीच करावा, असे आवाहन जालना पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.