Parallel Water Supply Scheme: Battle for Credit Between Incumbent and Former Office-Bearers
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहराच्या वाढत्या लोकसंख्येची गरज ओळखून प्रस्तावित १२४६ कोटी रुपयांच्या स्वतंत्र समांतर पाणीपुरवठा योजनेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी आपण पाठपुरावा केला असून, ही योजना अंबडमार्गे न आणता जालन्यासाठी स्वतंत्रपणे राबविण्यात येईल, असे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांनी गुरूवारी (दि.१२) जाहीर केल्यानंतर आज शुक्रवार, दि. १३ रोजी माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी जालना जायकवाडी या नव्याने प्रस्तावित असलेल्या या योजनेचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा खोचक टोला विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता लगावला.
यामुळे समांतर योजनेवरुन आजी सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शुक्रवारी जालन्याचे माजी आमदार गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचा नामोल्लेख न करता खोचक टोला लगावला. याव्यतिरिक्त नवीन काही मंजूर करून त्यासाठी बाराशे नाही तर चौदाशे कोटी रुपये मंजूर करून आणा त्याचे आम्ही स्वागतच करू असेही माजी आमदारात श्रेयवादाची लढाई त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेस जालना मनपाच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, पाणी पुरवठा सभापती पूनम स्वामी, नगरसेवक महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, रिमा काळे आदींची उपस्थिती होती.
प्रस्तावित पाणी पुरवठा योजना ही वर्ल्ड बँकेच्या आर्थिक सहाय्यातुन करण्यात येणार असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण मे २०२६ मध्ये मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत योजनेच्या पडताळणीसाठी वर्ल्ड बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जालना येथे पाठवले होते. त्यानंतर दि. २८ जुलै २०२६ रोजी वर्ल्ड बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पैठण येथील जॅकवेल आणि अंबड येथील जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली दोती असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार यांनी पाठपुराव्याचे दिले पत्र
माजी आमदार गोरंट्याल यांनी जायकवाडी जालना या समांतर पाणी पुरवठा योजना आणि त्यासाठी मागील सहा ते सात महिन्यांत मुख्यमंत्री फडणवीस आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती देऊन त्याबाबतचे लेखी पत्र उपस्थीत पत्रकारांना दिले. नाशिक येथील एकम व्हेंचस या कंपनीकडून सदर योजनेचा डीपीआर तयार करून घेण्यात आल्याचे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले. या योजनेद्वारे शहराला दररोज ६३ एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पूर्वीच्या जायकवाडी- जालना आणि प्रस्तावित समांतर योजना या दोन्ही मिळून भविष्यात ११५ एमएलडी पाणी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.