Jui Dam : जुई धरणात केवळ ३ टक्के जलसाठा file photo
जालना

Jui Dam : जुई धरणात केवळ ३ टक्के जलसाठा

२५ गावांवर भीषण पाणी टंचाईचे सावट

पुढारी वृत्तसेवा

Only 3 percent water storage in Jui Dam

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा यंदा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. आज रोजी धरणात केवळ ०.२०० दलघमी म्हणजेच ३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणावर भोकरदन शहरासह २५ गावांची तहान भागविली जाते, तसेच सुमारे ६०० हेक्टर जमीन रब्बी पिकांसाठी कालव्याद्वारे सिंचनाखाली येते. मात्र, यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने पिण्याच्या पाण्यासह रब्बी हंगामावरही संकटाचे सावट आहे.

जुई धरणातून भोकरदन शहर, आन्वा, वाकडी, कुकडी, कठोरा बाजार, कल्याणी, करजगाव, रेणुकाई पिंपळगाव, दानापूर, मनापूर, वाडी खुर्द, वाडी बुद्रक, पळसखेडा मुर्तड, सुरंगळी, सुरंगळी वाडी, वरुड बु, रेलगाव, भायडी, दगडवाडी, तळणी, विरेगाव, बाभुळगाव, लिंगेवाडी, सिपोरा बाजार, गोद्री, वडशेद, नवे व जुने, रामेश्वर कारखाना आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांना नळाचे करणे गरजेचे आहे.

अनेक ठिकाणी नळाचे पाणी नाल्याद्वारे वाहून जाताना दिसत आहे. धरणातील अतिक्रमित विहिरींवरही देखरेख आवश्यक आहे. पाऊस न झाल्यास येणारा काळ पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय गंभीर ठरू शकतो. १९७२ च्या दुष्काळात पाणी होते, मात्र अन्न नव्हते; यंदा अन्न असेल, पण पाणी नसेल, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जुई धरणावर भोकरदन शहराच्या पाणीपुरवठ्यासह परिसरातील सुमारे २५ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची मुख्य मिस्त या धरणावर असल्याने साठा वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात आहे, तर दुसरीकडे धरणातील पाण्याचा उपसा सुरू असून वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनही वाढत चालले आहे. धरणातील मर्यादित पाणीसाठ्यामुळे पाणी चोरी रोखणे हेही प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरत आहे.

उपलब्ध प्रत्येक थेंब पिण्यासाठी राखून ठेवण्याची आवश्यकता असताना अनधिकृत उपसा झाल्यास संकट आणखी तीव्र होऊ शकते. त्यामुळे धरण परिसरातील पाणी उपशावर लक्ष ठेवण्यात येत आहे. धरणातील पाणी आणखी कमी झाल्यास नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT