आयशर, उसाच्या ट्रॅक्टर अपघातात एक ठार, एक जखमी  file photo
जालना

आयशर, उसाच्या ट्रॅक्टर अपघातात एक ठार, एक जखमी

बीडकडे जाणाऱ्या आयशरने उसाच्या ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली या धडकेत ट्रॅक्टर चालक हा जागीच ठार झाला

पुढारी वृत्तसेवा

One killed, one injured in Eicher, sugarcane tractor accident

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा ः बीडकडे जाणाऱ्या आयशरने उसाच्या ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली या धडकेत ट्रॅक्टर चालक हा जागीच ठार झाला असून आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री 11:30 च्या दरम्यान वडीगोद्री जालना मार्गावरील धाकलगाव येथे घडली.

जालन्याहून बीड कडे जाणाऱ्या आयशर क्रमाक एम एच 13 बी क्यू 1998 ने कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच 21 ए.एन. 3368 च्या ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली.

या धडकेत ट्रॅक्टर चालक जालिंदर रामराव चव्हाण वय 30 रा. चिचखेड तांडा ता.अंबड हा जागीच ठार झाला आहे. तर आयशर चालक पूर्ण नाव माहीत नाही हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी गोंदी पोलिसांनी येऊन मयत व जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT