NCMC card : 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्यता ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल file photo
जालना

NCMC card : 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्यता ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल

महिला प्रवाशांना मोठा दिलासा; आगारासह ग्रामीण पातळीवर केली जाणार नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

'NCMC' card mandate relaxed until December 31

जालना, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यभरातील कोट्यवधी महिला प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. एसटी बस प्रवासात सवलतीचा लाभ घेण्यासाठी पूर्वी अनिवार्य करण्यात आलेली 'एनसीएमसी' (NCMC) कार्ड काढण्याची अट आता ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, आता त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य शासनाच्या महिला सन्मान योजनेंतर्गत एसटी प्रवासात सवलत मिळवण्यासाठी १ ऑक्टोबर पासून एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, महिला लाभार्थ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता, अद्यापपर्यंत केवळ १ कोटी १० लाख महिलांचीच एनसीएमसी कार्ड नोंदणी किंवा वितरण झाले असल्याचे समोर आले.

विशेषतः गावखेड्यातील गार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल एसटी महिलांपर्यंत माहितीचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोंदणी राहिली होती. ही तांत्रिक अडचण लक्षात घेऊन महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एनसीएमसी कार्डची अनिवार्यता ७ नोव्हेंबर पासून थेट ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काळात नोंदणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर मोहीम

कार्ड नोंदणी आणि वित्रणासाठी ग्रामपंचायत स्तरापर्यंत जाऊन विशेष शिबिरे राबवण्याचे आदेश सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. या शिबिरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. आगामी ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के महिलांची एनसीएमसी कार्ड नोंदणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यंत्रणेस आवश्यक त्या सूचना - कार्ड काढण्याची मुदत वाढवली असली तरी महिलांची एसटी प्रवासातील सवलत विनाअडथळा सुरूच राहणार आहे. ज्या महिलांकडे अद्याप एनसीएमसी कार्ड नाही, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या आगारात किंवा ग्रामीण भागातील महिलांना जागरूक करण्यासाठी महामंडळामार्फत विशेष मोहीम राबवली जात आहे. माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि संबंधित यंत्रणा (मे. ईबिक्स टेकनॉलॉजिस लि.) यांना यासंदर्भात योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मनीषा सपकाळ, विभाग नियंत्रक, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT