Municipal election campaign in full swing
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यातील परतुर, अंबड व भोकरदन या चार नगर पालीका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उमेदवार कॉर्नर बैठकांसह मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटीवर देत आहे. निवडणुक प्रचाराने वातावरण६ तापले असुन विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभाव्दारे निवडणुक प्रचाराला गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परतुर नगर पालीका निवडणुक महायुतीने प्रतिष्ठेची केली असुन महायुतीतील पक्ष या निवडणुकीत आमने सामने दिसत आहेत.
जालना जिल्ह्यातील भोकरदन नगर पालीकेत नक्षराध्यक्षपदासाठी ४, परतुर ९, अंबड ५ उमेदवार निवडणुक लढवित आहेत. भोकरदन तालुक्यात भाजपा व शिंदे शिवसेना नक्षराध्यक्षपदासाठी एकत्र लढत आहे. ही निवडणुक माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. भोकरदन पालीकेत रा कॉ अजित पवार, काँग्रेस व राकॉ शरद पवार यांनी नक्षराध्यक्षपदासाठी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.
भोकरदन पालीका यापुर्वी काँग्रेसच्या ताब्यात असल्याने पालीका ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अंबड नगर पालीकेच्या नक्षराध्यक्षपद निवडणुकीसाठी ५ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या पालीकेत भाजपा, शिवसेना शिदे, राकाँ (अजित पवार) स्वतंत्र तर महाविकास आघाडीकडुन राकॉ (शरद पवार) पक्षाचा उमेदवार निवडणुक लढवित आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किती मते घेतात यावरही मुख्य पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबुन राहणार आहे. परतुर पालीका निवडणुकीत ९ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
माजी आ. सुरेशकुमार जेथलिया हे त्यावेळेस काँग्रेसमधे असल्याने ही पालीका काँग्रेसच्या ताब्यात होती. त्यानंतर जेथलिया यांनी नगर पालीका निवडणुकीच्या तोंडावर राकों (अजित पवार) पक्षात प्रवेश केल्याने पालीका निवडणुकीत चुरस वाढली आहे. रॉकॉ अजित पवार पक्ष व भाजपा यांच्यात लढत होण्याची शक्यता आह. भाजपाचे आ. बबनराव लोणीकर यांच्यासाठी ही निवडणुक महत्वाची राहणार आहे. परतुर नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार रिंगणात असुन कोण कोणाची मते घेतात यावर भाजपा व राका (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांचा जय-पराजय अवलंबुन राहणार आहे.