Old Vehicles Modification : जुन्या वाहनांचे मॉडीफिकेशन ठरतेय जनतेसाठी त्रासदायक File Photo
जालना

Old Vehicles Modification : जुन्या वाहनांचे मॉडीफिकेशन ठरतेय जनतेसाठी त्रासदायक

तरुणांमध्ये वाढत चालले आकर्षण, वाहनांच्या मूळ रचनेत होतोय बदल

पुढारी वृत्तसेवा

Modification of old vehicles is becoming a nuisance for the public.

आन्वा, पुढारी वृत्तसेवा: हल्ली तरुणामध्ये दुचाकी वाहनात मॉडीफिकेशनचा ट्रेंड वाढत चालला आहे. वाहनांच्या मूळ रचनेत बदल करून द्याकी अधिक आकर्षक व स्टायलिश बनविण्याकडे तरुणांचा ओढा वाढत चालला आहे. मात्र हा बदल जनतेसाठी त्रासदायक ठरत आहे.

कार्यक्षमता आणि गती वाढविण्यासाठी तांत्रिक बदलापर्यंत मॉडीफिकेशनची लोकप्रियता वाढली आहे. वाहनांच्या मुळ रंगावर स्टिकर्स, ग्राफिक्स तसेच विविध पेंटिंग्स लावले जात आहे. यामुळे वाहनांवरील कंपनीची सुरक्षितता धोक्यात येत आहे. दुचाकी वाहनांमध्ये फॅशनच्या दृष्टिकोनातून बदल करण्यात तरुणाईचा कल वाढत चालला आहे.

डिझाईन, रंगापासून ते साइड मिरर काढून छोट्या मिररचा वापर केल्या जात आहे. सीट्स, हॅन्डलबार आणि चाकांमध्ये अनावश्यक बदल केले जात आहे. दुचाकी मागील बाजूस फॅन्सी ग्रील तसेच अलायव्हील बसविले जात आहेत. इंजिन, एअर फिल्टर आणि एक्सास्ट यंत्रणा बदलण्यापर्यंत मर्यादा ओलांडल्या जात आहे. एवढेच काय सायलन्सर मधून फटाक्याचे कर्णकर्कश आवाज अपघाताला आमंत्रण देत आहेत. वेग अधिक करण्यासाठी गाडीचे तांत्रिक स्वरूपही बदलले जात आहे.

वाहनांमध्ये मॉडीफिकेशन करताना स्पोर्टी लुकसाठी रंगाचे विविध प्रयोग, आवाजातील बदल, मॅन्युअल गिअर यंत्रणा, एलईडी दिवे, चाके आणि इतर भागांमध्ये बदल केल्यामुळे वाहन अधिक वेगळे आणि आकर्षक दिसत आहे. दुचाकी वाहनातील बदलाचे हे आकर्षण असले तरी वाहतुकीसाठी आणि सुरक्षितेसाठी मोठा धोका यामधून निर्माण होण्याची शक्यता पाहता परिवहन विभागाने यावर वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

गॅरेज व्यावसायिकांचे वेगवेगळे पॅकेज

तरुणांच्या वाढत्या मागणीनुसार शहर आणि ग्रामीण भागात तरुणाईची मॉडीफिकेशनची फॅशन पाहता गॅरेज व्यावसायिकानी विविध प्रकारच्या मॉडीफिकेशनसाठी वेगवेगळे पॅकेज तयार केले आहे. त्यात रंगसंगती बदल, एलइडी दिवे, लाइटिंग सेटअप, सायलंसर मॉडीफिकेशन, चाके आणि अलाय व्हील, बॉडी किट आणि स्पाईलर, सीटिंग कस्टमायझेशन, परफॉर्मन्स किट्स असे विविध प्रकारचे दोन हजारांपासून ४० हजारांपर्यंतचे स्वतंत्र पॅकेज तयार केले आहे.

दुचाकी असो वा कोणतेह वाहन नियमबाह्य व अतिरिक्त प्रकाश व आवाज व्यवस्था करणे चुकीचे आहे. कुठल्याही वाहनाला वाजवीपेक्षा अधिक प्रकाश किंवा कर्णकर्कश हॉर्न किंवा फटाके मारणारे सायलन्सर वाहनांना लावणे टाळावे, जेणेकरून इतरांना त्याचा कोणताही त्रास होणार नाही, याची सर्व वाहनचालकांनी काळजी घ्यावी व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.
-किरण बिडवे, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT