Jalna News : आ. संतोष दानवेंकडून पिकांची पाहणी file photo
जालना

Jalna News : आ. संतोष दानवेंकडून पिकांची पाहणी

शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवुन देण्याचे दिले आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

MLA Santosh Danve inspects crops

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : जाफ्राबाद-भोकरदन तालुक्यात पावसाने दडी दिल्याने तसेच पावसात पडलेल्या खंडामुळे अनेक भागांतील पिकांवर संकट ओढावले आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके करपून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीची राज्य पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा शिवार आणि वरुड बु. येथे आमदार संतोष दानवे यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देत पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली. पावसाच्या लहरीपणामुळे करपून चाललेली पिके, पाण्याची टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेली शेतकऱ्यांची चिंता याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, पिकांचे नुकसान, पावसाची स्थिती तसेच संभाव्य मदतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदत, पीक विमा तसेच शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT