MLA Hikmat Udhan: Declare a drought in the Ghansawangi constituency
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता आता गंभीर संकटात बदलली आहे. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने शेतातील सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.
पिकांसाठी केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर घनसावंगी विधानसभा मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार हिकमत उढाण यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (दि. १९) कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक झाली या बैठकीत आमदार उढाण यांन घनसावंगी मतदारसंघातील पावसाच स्थिती, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्य निदर्शनास आणून दिल्या.
पावसान मोठा खंड दिल्याने अनेक भागांतील पिकांची वाढ खुंटली असून, काह ठिकाणी पिके वाळून करपली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोट परिणाम होण्याची शक्यता आहे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षाव घेऊन तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्यासोबतच्च कर्जमाफीची अंमलबजावण जलदगतीने करावी. असे म्हटले.
ठोस निर्णय घ्या
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभमिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी तसेच ऊस पिकाचाही पीकविमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन आर्थिक मदत करावी.