जालना : एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील 52 रुग्णालयांमध्ये 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत 1 लाख 27 हजार रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात नोंदणीकृत 500 रुग्णालये आहेत. या योजनेच्या पॅनलमध्ये समाविष्ट होण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रयत्न करण्यात आले होते. त्यानुसार आणखी 10 रुग्णालयांनी प्रतिसाद दिला. त्यांचे प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा लाभ मिळून आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील, या साठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेतला जात आहे. जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक खाटांच्या रुग्णालयांचा जास्त आणि एकल विशिष्ट 10 खाटांच्या विशेषतः रुग्णालयांचा एकत्रित आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत पॅनलवर समावेश करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि परवडणार्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील. वाढीव 10 खासगी हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
सध्या 52 संलग्न रुग्णालयांतून मोफत उपचाराची सोय जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण अशा शासकीय 12, तर खासगी 40 रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सोय आहे. वाढीव 10 खासगी हॉस्पिटलचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. पात्र एकल विशेषतः रुग्णालयांत नाक, कान, घसा, नेत्रविकार, अस्थिव्यंग आणि पॉलिट्रॉमा, भाजणे, बालरोग शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार युनिट्स, नवजात आणि बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन युनिट्स आदी पॅनलवर सहभागी होण्यास पात्र आहेत. या संलग्न रुग्णालयात 50 आरोग्य मित्रांच्या सहाय्याने दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना लाभ दिल्या जातो. त्यांच्या आयुष्यात आनंद पसरविण्याचे काम या माध्यमातून होत आहे.
वर्ष लाभार्थी
2024-25 16 हजार 686
एप्रिल ते आतापर्यंत 9 हजार 486
एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळत आहे. नागरिकांनाही जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती www.jeevandayee.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. संबंधितांनी रुग्णालयात संपर्क साधावा.डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक