Maratha Reservation Manoj Jarange Patil News
मनोज जरांगे-पाटील  Pudhari File Photo
जालना

लढायचे की पाडायचे ? मराठा समाजाची आज निर्णायक बैठक

Maharashtra Assembly polls 2024 | मनोज जरांगे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : Maharashtra Assembly polls 2024 | विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या वतीने उमेदवार उभे करावेत की पाडावेत? याविषयी शनिवारच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र, आज रविवारी होणारी बैठक निर्णायक असेल. त्यामध्ये अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारी दिली.

अंतरवाली सराटी येथे तज्ज्ञ, वकील, राजकीय अभ्यासक आदींची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर जरांगे म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही. आज रविवारच्या बैठकीत निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला तर फॉर्म भरायचे आहेत; अन्यथा उमेदवार पाडायचे ठरणार आहे.

ठरलं तर अपक्ष म्हणून दणका द्यायचा

स्वबळावर लढणार की युती करणार, यावर ते म्हणाले की, ते सगळं आज रविवारी ठरेल. कुणाच्या सोबत जाणार नाही. ठरलं तर अपक्ष दणका हाणून द्यायचा, असे जरांगे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.