जालना

Maratha Reservation Manoj Jarange |सरकारला हवा तेवढा वेळ दिला म्हणत मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण सुरु

स्वालिया न. शिकलगार

जालना : पुढारी ऑनलाईन डेस्क - आम्ही सरकारला हवा तेवढा वेळ दिलाय. पण, मराठा समाजाला दगा दिल्याने उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते आज शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली. आरक्षणावर आम्ही ठाम आहे, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

'सगेसोयरेंनाही ओबीसींचाही कडाडून विरोध आहे. कुणबी प्रमाणपत्रे देणं बंद केलंय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण येऊ लागलीय. पोलिस भरतीत तरुणांना अडचणी येत आहेत. मुलींना अद्याप मोफत शिक्षण मिळत नाहीये. मुलींना मोफत शिक्षण तर अटी कशाला? ईडब्ल्यूएस सरकारमुळे बंद झालंय. ईडब्स्यूएस, एसईबीसी, आणि ओबीसी प्रमाणपत्र हे सुरु ठेवा. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी आमची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकचं आहे. जो कायदा आहे. त्यांचे व्यवसाय एकच त्यात दुरुस्ती करा अथवा वेगळा कायदा बनवला तरी हरकत नाही. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली, त्यांनी कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवीत.'

SCROLL FOR NEXT