मनोज जरांगे-पाटील 
जालना

Maratha Reservation : अंतरवाली सराटी सभेच्या तयारीला प्रचंड वेग

दिनेश चोरगे

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या सभेच्या पूर्वतयारीला सुरुवात करण्यात आली असून सभेसाठी मैदान व व्यासपीठ उभारणीच्या तयारीला आता वेग आला आहे. मराठा आरक्षणाविषयीच्या मागणीसाठी आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी मनोज जरंगे येणाऱ्या १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली मराठीत विराट सभा घेणार आहेत. या विराट सभेसाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या सभेसाठी जवळपास १०० एकर जागा तयार करण्यात येत आहे. सभेसाठी नियोजित स्थळाची साफसफाई करण्यात येत असून व्यासपीठ उभारणीचे काम सध्या जोरात सुरू आहे.

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोजित भव्य सभेसाठी होणारा खर्च गोदाकाठची १२३ गावांतील समाजबांधव लोकवर्गणी जमा करुन करणार आहेत. यासाठी विद्युत व्यवस्था, साउंड सिस्टिम, मंडप, पाणी व्यासपीठ, पार्किंग व्यवस्था, आसन व्यवस्थासह अनेक व्यवस्था व यासाठी मोठा खर्च होणार आहे आणि हा सर्व खर्च फक्त १२३ गावांतील समाज बांधवांच्या आर्थिक वर्गणीतून होणार आहे.

या कामासाठी ५ जणांचे निधी संकलन मंडळ निवडण्यात आले आहे. यात सुदामराव मुकणे, किशोर मरकड, ज्ञानेश्वर उढाण, सचिन मोटे, भाऊसाहेब नाटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. निधी संकलनासंबंधी आचारसंहिता व नियमावली ठरविण्यात आली असून फक्त १२३ गावांतूनच निधी घेतला स्वीकारला जाणार आहे. निधी संकलन मंडळातील समावेश असलेल्या वरील ५ सदस्यांकडेच आपल्या गावातला निधी जमा करण्याचे ठरले असून याव्यतिरिक्त कुणीही कुणाकडेही पैसे जमा करू नयेत अथवा देऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. १२३ गावाला दिलेला हा सन्मान समजून या महान कार्यात महत्त्वाचे योगदानाची जबाबदारी सर्व गावांनी स्वतःहून घेतली आहे.

या सभेसाठी कित्येक गाव पुढे सरसावली असून सभेच्या दिवशी येणाऱ्यांसाठी पुच्या दशम्या, शेंगदाण्याची चटणी, ठेचा करण्याची तयारी गावागावात चालू आहे. पिण्यासाठी शुद्ध पिण्याची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय येणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीची जबाबदारी काहींनी घेतली असून गाड्यांचे पंक्चर हवा भरणे, गाड्यांची किरकोळ दुरुस्ती विनामूल्य करून देण्यासाठी परिसरातील मेकॅनिक पुढाकार घेत आहेत. त्यामुळे सर्वार्थानि ही सभा खूपच गाजणार आहे.

चार ठिकाणी वाहनांची पार्किंग

अंतरवाली सराटीत येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था ही जवळपास १०० एकरांवर करण्यात येत आहे. बीड, जालना, छत्रपती संभाजीगरकडून येणाऱ्या वाहनांची पार्किंग वडीगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ६० एकरांवर जागेत करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येणाऱ्या वाहनांसाठी दुनगाव येथे तर पैठण, विहामांडवा मार्गी येणाऱ्या लोकांसाठी नालेवाडी गावात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT