Maratha community meeting in Antarwali today
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा आर-क्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या नियोजन आणि तयारीसाठी, रविवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला राज्यभरातून हजारो समाजबांधव येण्याची शक्यता आहे. आम्ही २ वर्ष सरकारला वेळ दिला अजून किती वेळ द्यायचा? असा सवाल उपस्थित करत मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी ही अंतरवालीतली उद्याची शेवटची बैठक असल्याचे सांगत या बैठकीत मराठा समाजाच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी व्हा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.
पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटील पुढे म्हणाले की, आतापर्यंत काय मिळालं. काय मिळवायचं? मुंबई मोर्चाचा रूट कसा असणार.? याबाबत उद्याच्य बैठकीत सविस्तर चर्चा होणार असून आपापली कामे सोडून बैठकीला या. मराठ समाजावर होत असलेला अन्याय थांबवणे हा बैठकीचा अजेंडा असून र्ह अंतरवालीतील शेवटची बैठक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२९ ऑगस्टल मुंबईत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. आता विजयच् मिळवायचाच असे सांगत मराठा समाजासमोर उद्या सगळ्या गोष्टींचा उलगड करणार, आताच मीडियासमोर सगळे सांगणार नाही, असे ही मनोज जरांगे यांर्न स्पष्ट केले. पूर्ण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय यावेळी मुंबई सोडणार नाही, असाही गर्भात इशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला.