Manoj Jarange's criticism of Shinde, Jadhav, Shirsat from a distance
जालना, पुढारी वृत्तसेवा आपण आवाहन केल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणीला आले. मी त्याची परतफेड मुंबईला जाऊन करणार आहे, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे यांचा उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. परभणीचा कार्यक्रम रद्द न केल्यामुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी शिंदे, खा. संजय जाधव, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर तोंडसुख घेतले.
उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आपणास ऐनवेळी कळाला. अंतरवाली ते परभणी हे अंतर १५५ किमी असून, परभणीच्या सीमा बंद केल्याने तेथे जाणे शक्य नव्हते. मी तेथे गेलो असतो तर सामना झाला नसता असे मत व्यक्त करून जरांगे म्हणाले, की खासदार संजय जाधव यांना आपण पहिल्यांदाचा फोन केला.
जाधव निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न केले. आता ते जेव्हा घरी बसतील तेव्हा माहिती होईल. मंत्री संजय शिरसाट यांनी मुद्दामहून, मराठवाड्यातील चार कुणबी प्रमाणपत्र रद्द केले आहेत. ते पन्हा दरुस्त होईपर्यंत उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात दौरा करु नये. दौरा केल्यास राज्यातील कायदा सुव्यवस्था जबाबदारी तमची राहील.
शिरसाट यांची स्टंटबाजी
मंत्री शिरसाट यांनी स्टंटबाजी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना खासदार संजय जाधव यांच्यामार्फत मराठवाड्यात आणल्याचा आरोप त्यांनी केला. संजय जाधव हे चंद्रशेखर बावनकुळे, शिरसाट यांच्या टोळीत सामिल झाले आहेत. मराठ्यांनी परभणीत ताकद दाखविण्यापेक्षा मुंबई येथे ताकद दाखवावी, असे सांगतांना जाधव, शिंदे यांना फळे भोगावी लागतील, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचा कार्यक्रम नंतर घेता आला असता, मराठा समाजाला जाधव यांनी सांभाळून घेणे गरजेचे होते. आता त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे. असे जरांगे यांनी मत व्यक्त केले.
बच्चू कडू यांचा फोन
परभणीच्या विषयावर आ. बच्चू कडू यांचा आपणास फोन आला. हा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नाही. बंडू जाधव यांनी त्या उद्देशाने कार्यक्रम घेतला असेल तर मला माहिती नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाल्याचे बच्चू कडू यांनी जरांगे यांना सांगितले. आंदोलन करताना मी सरकारची वाट बघत नाही. मी फक्त लढायचे शिकलेलो आहे. नुसत्या चर्चा करून काही फायदा नाही. चर्चा करून किती दिवस मराठा समाजावर अन्याय करू. वेळ मिळणार नाही. राधाकृष्ण विखे-पाटलांना काय कळतं, ते उपसमितीवर काम करतात तेच दुर्दैव आहे, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली-