जालना

Maratha Reservation : बीड – जालना सीमा सील; काही जिल्ह्यांतील इंटरनेटही बंद

मोहन कारंडे

बीड; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता बीड जिल्ह्यात पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. बीडला जोडणाऱ्या जालना जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

याबरोबरच काही जिल्ह्यातील इंटरनेट बंद करण्याबाबतचेही निर्देश देण्यात आले असून बीडमधील इंटरनेट सेवा बंद केल्याची माहिती मिळत आहे. बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT