बदनापूरः छत्रपती संभाजीनगर - जालना महार्गावर मराठा बांधवांनी अशा प्रकारे रास्तारोको आंदोलन केले.  छायाः भागवत पवार
जालना

Maratha reservation protest : बदनापुरात मराठा समाजाचा एल्गार; महामार्गावर रास्तारोको

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन; मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

बदनापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बदनापूर शहरात शुक्रवार, दि. ११ रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर - जालना महामार्गावर सुमारे एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्‍ट पासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसले आहेत. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे फारसे लक्ष देत नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बदनापूर तालुक्यातील मराठा बांधव रास्ता रोको निमित्त एकवटला.

यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘मनोज जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी महामार्ग परिसर दणाणून गेला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन व पोलिसांकडूनही आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

या रास्तारोको आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. त्यामुळे आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. या आंदोलनात तालुक्यातील मराठा बांधव सहभागी झाले.

यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बदनापूर पोलिसांनी रास्ताे रोको आंदोलनादरम्यान तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दुतर्फा वाहनांच्या रांगा; पोलिसांचा बंदोबस्त

दरम्यान, मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बदनापूर तालुक्यातील मराठा बांधवांनी जालना–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रास्तारोको आंदोलनानंतर बदनापूर पोलिसांच्यावतीने वाहतुक सुरळीत करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT