जालना ः बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील प्रगतशील शेतकरी नारायण चंद यांनी आपल्या दीड एकर शेतात शेतात चिया पीक घेतले आहे. सध्या अशा प्रकारे पीक जोमात आहे. pudhari photo
जालना

Chia cultivation Mandwa : मांडव्यात ‌‘चिया‌’ पिकाची दीड एकरात लागवड

कमी खर्चात एकरी 6 ते 7 क्विंटल उत्पादनाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

चंदनझिरा ः पारंपरिक शेतीसोबत नवनवीन प्रयोग करत प्रगतीचा मार्ग शोधणाऱ्या बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील प्रगतशील शेतकरी नारायण चंद पाटील यांनी थेट मेक्सिको देशातील ‌‘चिया‌’ या पिकाची लागवड करून शेतीत वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मांडवा (ता. बदनापूर) येथील नारायण पाटील यांनी आपल्या दीड एकर शेतात ‌‘चिया‌’ या पिकाची लागवड केली आहे. या पिकासाठी एकरी सुमारे दोन किलो बियाणे लागते आणि बियाण्याचा खर्च सुमारे 15 हजार रुपयांपर्यंत येतो. कमी खर्चात या पिकातून एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.

सध्याच्या बाजारभावानुसार या पिकातून एकरी सुमारे सव्वा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते, असेही सांगितले जाते. ‌‘चिया‌’ बियांमध्ये प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्याने या बियांना औषधी महत्त्व आहे.

आयुर्वेदिक औषधांमध्ये तसेच उन्हाळ्यात तयार होणाऱ्या शरबतामध्ये या बियांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे बाजारात या पिकाला चांगली मागणी असल्याचे शेतकरी सांगतात. सध्या वाशिम (महाराष्ट्र) तसेच इंदोर (मध्यप्रदेश) येथे या पिकाची प्रमुख बाजारपेठ उपलब्ध आहे.

‌‘चिया‌’ पिकाची वैशिष्ट्ये

  • मूळ देश : मेक्सिको, लागवड क्षेत्र : दीड एकर

  • बियाणे आवश्यकता : एकरी सुमारे 2 किलो

  • बियाणे खर्च : अंदाजे रु. 15 हजार

  • संभाव्य उत्पादन : एकरी 6 ते 7 क्विंटल

  • संभाव्य उत्पन्न : एकरी सुमारे रु.1.25 लाख

  • उपयोग : शरबत, आयुर्वेदिक औषधे

पारंपरिक पिकांसोबत नवनवीन पिकांचे प्रयोग केल्यास शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते. ‌‘चिया‌’ हे कमी खर्चाचे आणि चांगल्या मागणीचे पीक आहे. शेतकऱ्यांनी अशा नव्या पिकांकडेही लक्ष द्यावे. चिया पिकाकडे पौष्टिक आहार म्हणूनही पाहिल्या जाते. चिया पिकासाठी प्रमुख बाजारपेठ आपल्या राज्यातील वाशिम जिल्हा आणि मध्यप्रदेशातील इंदोर येथे उपलब्ध आहे.
नारायण चंद, शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT