Jalna News : मक्याचा कणसाला फुटले कोंब, शेतकरी संकटात, नुकसान भरपाई देण्याची मागणी  File Photo
जालना

Jalna News : मक्याचा कणसाला फुटले कोंब, शेतकरी संकटात, नुकसान भरपाई देण्याची मागणी

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात गेल्या पाच दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पडून असलेल्या मका पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maize crop damaged by rain, farmers in distress, demand for compensation

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात गेल्या पाच दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पडून असलेल्या मका पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतात पडेल असलेल्या मक्याचा चारा पूर्णपणे खराब झाला आहे.. त्यातच मकाच्या कणसाला कोंब फुटत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. दिवाळीच्या सणासुदीमध्ये शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे.

यावर्षी पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबवणीवर पडला आहे. खरिप हंगामातील पीकेच शेतात उभी आहे. खरिप हंगामातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी यांचे कंबरडे मोडले आहे. रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी मजूर न लावता मका घरीच सोंगणी केली. सोंगणी झाल्यानंतर पाऊस झाल्याने कणसे शेतात पडून आहे. त्यांना कोंब फुटत आहे.

बेभाव विक्री शेतातील मकाला कोंब फुटले आहे. ही मका विकून मला रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा बियाणे घेण्यासाठी पैसे लागत होते. परंतु शासनाने मदत जाहीर केली होती. अद्यापपर्यंत मिळाली नाही. त्यातच मकाचा कणासाला उभे फुटले असल्याने ही मका अजून शेतातच पडून आहे ती काढल्यानंतर बेभाव विक्री करून एक रुपयाही उत्पन्न वाढ होणार नाही.
- समाधान नरवाडे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT