Maize and soybeans damaged due to rain
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीचा सण अवघ्या तीन दिवसांवर आला - असतानाच भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सोंगणी करून टाकलेल्या मका व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या महिन्यात अतिवृष्टी जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली होती. या अचानक आलेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातुर आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
पुढील २४ तासांत अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातून मान्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कायमच राहणार आहेत. १९ ऑक्टोबरपर्यंत पाऊस असणार आहे, असे हवामान अंदाजानुसार वर्तविण्यात येत आहे.
पुन्हा पाऊस
शेतकऱ्यांच्या शेतीपिकांसह पशुधनाचही नुकसान झाले होते. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटात असताना आता पुन्हा एकदा पावसाने अडचणीत आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे.