Jalna News : चिमुकली सईला मिळाले नवे आयुष्य ! file photo
जालना

Jalna News : चिमुकली सईला मिळाले नवे आयुष्य !

आ. हिकमत उढाण यांच्या पुढाकारातून यशस्वी हृदयशस्त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

Little Sai has been given a new lease on life!

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : संकटाच्या काळात मिळालेली मदत एखाद्या कुटुंबासाठी किती मोलाची असते, याचा प्रत्यय घनसावंगीतील बुंबे कुटुंबीयांना आला. हृदयविकाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या सई भास्कर बुंबे हिला आमदार हिकमत उढाण यांच्या संवेदनशील पुढाकारामुळे नवजीवन मिळाले आहे. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सईवर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. आज सईची प्रकृती सुधारत असून तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे.

२४ मे २०२६ रोजी आमदार हिकमत उढाण यांच्या पुढाकारातून लहान बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी व हृदयशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात घनसावंगी येथील सई भास्कर बुंबे हिची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिला हृदयशस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले.

उढान यांचे ही बाब समोर येताच बुंबे कुटुंबीयांसमोर चिंतेचा डोंगर उभा राहिला. मात्र, आमदार उढाण आणि मायाताई उढाण यांनी या चिमुकलीच्या उपचारासाठी विशेष लक्ष घातले. आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नांमुळे ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सईवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. एका चिमुकलीला वेळेत उपचार मिळाल्याने बुंबे कुटुंबीयांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण परतले. त्यांनी आ. हिकमत उढाण यांचे आभार मानले.

मदत मोलाची ठरली

घनसावंगी येथील सईचे वडील भास्कर बुंबे यांनी मनोगत व्यक्त केले. मुलीच्या उपचारादरम्यान आमदार हिकमत उढाण आणि मायाताई उढाण यांनी केलेले सहकार्य, दाखवलेली आपुलकी आणि संकटसमयी दिलेला आधार यांची आठवण सांगताना त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. एका सामान्य कुटुंबाच्या अडचणीच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून उढाण यांनी दाखवलेली संवेदनशीलता आमच्यासाठी मोलाची ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT