ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर लिक्विडेटरची नियुक्ती होणार आहे.  Pudhari Photo
जालना

ठेवीदारांना दिलासा : ज्ञानराधा बँकेवर लिक्विडेटरची नियुक्ती होणार

Gnanaradha Multistate Fraud | सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

शहागड, पुढारी वृत्तसेवा : ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक छोट्या गुंतवणूकदारांच्या व शेतकरी सभासदांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन केन्द्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लिक्विडेटर नेमण्यात येणार असल्याचे सांगितले. नवी दिल्ली येथे त्यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. यावेळी त्यांनी याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला बदनापूर-अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे, ठेवीदार प्रतिनिधी रामेश्वर तिरमुखे तसेच केन्द्रीय निबंधक सहकारी समितीचे अधिकारी यांची उपस्थिती होती.

ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या विरोधात अनेक तक्रारीच्या अनुषंगाने अधिनियमाच्या कलम ८९ अंतर्गत या प्रकरणात एका लिक्विडेटरची नियुक्ती अधिनियमाच्या नियम २८ आणि २९ नुसार सोसायटीच्या दायित्वांचे वितरण करण्यासाठी करण्यात येणार आहे. प्रस्तुत लिक्विडेटर सोसायटीच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल, आणि मालमत्तांच्या उपलब्धतेनुसार सोसायटीच्या सदस्यांना, ठेवीदारांना टप्प्याटप्प्याने त्यांची रक्कम परत करेल.

तसेच दिलेल्या निर्देशानुसार MSCS कायदा 2002 च्या कलम ८६ अंतर्गत सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला १५ दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत आहे. यामुळे समाजातील गरीब सभासद आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास आणि त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे परत मिळण्यास मदत होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT