Jalna News : लिहा येथे मटका अड्ड्यावर छापा; वरुड बु. येथे जुगार अड्ड्यावर कारवाई, चौघे ताब्यात तर पाच जण पसार file photo
जालना

Jalna News : लिहा येथे मटका अड्ड्यावर छापा; वरुड बु. येथे जुगार अड्ड्यावर कारवाई, चौघे ताब्यात तर पाच जण पसार

जालना जिल्ह्यात अवैध मटका व जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Liha at Matka Adda here; Warud Bu. Action on gambling dens here

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात अवैध मटका व जुगार व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. भोकरदन तालुक्यातील लिहा येथे एसपी स्क्वॉडने मटका अड्ड्यावर छापा टाकून ५५ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर जाफराबाद तालुक्यातील वरुड बु. येथे सुरू असलेल्या तीन पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पाच जण पसार झाले असून, रोकड, मोबाईल, दुचाकी व जुगाराचे साहित्य असा २ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लिहा, ता. भोकरदन येथे पारध पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसपी स्क्वॉडने ही कारवाई केली. या कारवाईत ३९ हजार २२० रुपयांची रोख रक्कम आणि १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ५५ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मटका व्यवसायाशी संबंधित एका व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील बसस्टॉपच्या मागील बाजूस मोबाईल टॉवरजवळ उघड्यावर तीन पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) सायंकाळी सुमारे पाच वाजता पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी पसार झाले. चौघांना पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतले.

या कारवाईत १५ हजार १९६ रुपये रोख, तीन मोबाईल, तीन मोटारसायकली, खाट, खुर्चा, चटई आणि ५२ पत्त्यांचे कॅट असा एकूण २ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जाफराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. एस. जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलिस कर्मचारी योगेश पवार, अनंत भुतेकर, नारायण गिराम, अनिल डुरे, ओमप्रकाश नागरे, सचिन कवलिंगे, विष्णू जायभाय, ज्ञानेश्वर सुरुशे, चंद्रशेखर मस्के, संदीप भागिले आणि मीना बनकर यांनी कारवाईत सहभाग घेतला. तपास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT