Leopard terror continues in Pimpalgaon Renukai
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई सह परिसरामध्ये गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याची दहशत कायम आहे.
कुत्र्याची हरणाची आणि त्यानंतर आता गायीच्या पिल्लाची देखील शिकार केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याची दहशत असताना सुद्धा तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत वन विभागाकडून कसली उपाययोजना करण्यात आली नाही. चार महिन्यानंतर वन विभागाला जाग आली. वन विभागाने परिसरामध्ये पिंजरा लावल्यानंतर देखील बिबट्या यामध्ये अडकला नाही. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमधून देखील होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई येथे वन्य प्राणी बिबट्याच्या हल्ल्यात बाबू भगवान सास्ते यांच्या मालकीच्या वासरा वर हल्ला करून ठार केले. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी भोकरदन योगेश डोमळे यांनी घटनेच्या ठिकाणी भेट देऊन रीतसर पंचनामा नोंद केला.
माझ्या शेतात जनावरे असतात. मात्र अचानक बिबट्याने हल्ला करुन आमचे वासरु ठार केले. वनविभागाने पंचनामा केला आहे, परंतु तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा. नसता अधिक जनावरं मृत्युमुखी पडतील. याची नुकसान भरपाई देण्यात यावी.बाबु सास्ते, शेतकरी
पिंपळगाव परिसरात बिबट दिसल्याची बरीच चर्चा 66 असल्याने ८ दिवसा पूर्वी वन विभागाने पिंजरा लावला होता. त्यानुसार आज ज्या भागात बिबट्या ने शिकार केली. त्या भागात पिंजरा लावण्यात आला आहे.योगेश डोमळे, वनमंडळ अधिकारी