बिबट्याने शिकार अशी झाडावर नेऊन फस्त केली. Pudhari News Network
जालना

Leopard News : गेवराई सेमी शिवारात बिबट्याचा वावर

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड (जालना) : तालुक्यातील गेवराई सेमी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने केलेली शिकार एका झाडावर मृत अवस्थेत मिळून आली. शिवाय बिबट्याच्या पायाचे ठसे देखील दिसून आले. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली.

गेवराई सेमी, उमरावती, पळशी, अंधारी, के-हाळा गावांना डोंगर लागून आहे. या डोंगरभागात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. तर शेतकरीही डोंगरभागात जनावरे नेतात. शिवाय डोंगरालगत अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. एवढेच नव्हे तर काही शेतकरी डोंगराशेजारी वास्तव्यास आहे. गेवराई सेमी शिवारात रविवारी (दि. ९) बिबट्याने केलेली शिकार एका झाडावर मिळून आली. यामुळे शेतकरी प्रचंड घाबरले. ही माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला देताच कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली.

यापूर्वी पळशी शिवारातील डोंगरालगत असलेल्या खोरा परिसरात बिबट्या दिसून आला होता. सध्या रब्बी हंगामाच्या पेरणीची लगभग सुरू आहे. तर पाणी भरण्यासाठी महावितरण कंपनीकडून चार दिवस दिवसा तर चार दिवस रात्री असा वीजपुरवठा केला जातो. रात्रीच्या शिफ्टमध्ये पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागते. त्यात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गेवराई सेमी, पळशी, के-हाळा येथील शेतकऱ्यांनी केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT