शहागड: गावातील काही लोकांनी शेतातील लिंबाचे झाड तोडले होते. जाब विचारणाऱ्या दोन जणांना आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली.
शहागड (ता.अंबड) येथील मुजीब शेख, मोईन शेख यांच्या शेतीतील लिंबाचे झाड गावातील काही लोकांनी तोडले होते. शेतातील झाड का तोडलं असा जाब विचारला होता. दरम्यान जाब विचारण्याचा राग धरून दि.१३ जून शुक्रवारी सायंकाळी मुजीब शेख, मोईन शेख हे दोघे कामावरून परतत असताना, अकबर काझी, रेहान काझी, गुड्डू काझी, शाहनवाज काझी, अख्तर काझी, नईम शेख, खीजर काझी, सोफीयान काझी यांनी चाकू, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या नंतर जाब विचारला तर जिवे मारण्याची धमकी दिली.
शेख मुजीब यांच्या फिर्यादीवरून अकबर काझी, रेहान काझी, गुड्डू काझी, शाहनवाज काझी, अख्तर काझी, नईम शेख, खीजर काझी, सोफीयान काझी या आठ जणांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.