Kharif crops in poor condition due to heavy rains
शहागड, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने भिजलेला कापूस हातात घेऊन अतिवृष्टीमुळे पिकांची झालेली दयनीय अवस्था दाखवली. 'ओला दुष्काळ' जाहीर करावा, बँकांनी होल्ड केलेली खाती मोकळी करावीत, तसेच 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे कर्ज खात्यात वर्ग न करता थेट शेतकऱ्यांच्या हातात द्यावेत, शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करावी, अशी मागणी केली.
अंबड तालुक्यातील धाकलगाव शिवारातील शेतात जाऊन कृषीमंत्री भरणे यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी यांच्यासोबत संवाध साधला. यावेळी शेतकरी म्हणाले की, कुठलाही निकष न शेतकऱ्यांच्या मुलांची लावता. सरसकट शैक्षणिक फी माफ करा. सन २०१८ मध्ये मंजूर असलेला खरीप पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना वाटप करा. ई-पिक पाहणी करण्यास शेतकर्यांना अडचणी येत असून पिक पाहणी ऑफलाईन करण्यात यावी. फार्मर आईडी प्रलंबित प्रकरणे निकाली काढा. नदी व नाल्याजवळील व पानलोट क्षेत्राखालील माती खरडवून गेलेल्या जमीन मालकांना नैसर्गिक आपत्ती पुनर्वसन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.
अशा मागण्या कृषिमंत्र्या कडे शेतकऱ्यांनी केल्या. कर्जमाफीच्या बाबतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. यावेळी आमदार नारायण कुचे, माजी आमदार शिवाजी चोथे, माजी आमदार अरविंद चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा संताप पाहून कृषिमंत्री भरणे यांनी त्यांना आश्वासन दिले. ते म्हणाले, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. कधी गारपीट होते, कधी अतिवृष्टी होते, तर कधी दुष्काळ पडतो. सगळ्यांचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळेल.