कल्याणी घोगरे हिची धर्मादाय कार्यालयीन निरीक्षकपदी निवड file photo
जालना

कल्याणी घोगरे हिची धर्मादाय कार्यालयीन निरीक्षकपदी निवड

चिंचोलीच्या अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी बनली अधिकारी

पुढारी वृत्तसेवा

Kalyani Ghogare Selected as Charity Office Inspector

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली या छोट्याशा खेड्यातून एक प्रेरणादायी यशकथा पुढे आली आहे. अल्पभूधारक शेतकरी मारोती घोगरे यांच्या कन्या कल्याणी मारुती घोगरे हिने प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत थेट सरळ सेवा प्रक्रियेतून धर्मादाय कार्यालयीन निरीक्षक पदावर निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहानपणापासूनच आर्थिक अडचणींचा सामना करत वाढलेल्या कल्याणीने परिस्थितीला कधीही शरण न जाता शिक्षणाला प्राधान्य दिले. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण तिने मत्स्योदरी प्रशाला, मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे पूर्ण केले. ग्रामीण शाळेतील साध्या वातावरणात शिक्षण घेत असतानाही तिने अभ्यासात सातत्य ठेवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

उच्च शिक्षणासाठी तिने छत्रपती संभाजीनगर येथे पाऊल टाकले. शहरातील स्पर्धात्मक वातावरण, वाढता खर्च आणि घरची मर्यादित परिस्थिती या सर्व अडचणींवर मात करत तिने शिक्षण पूर्ण केले. या काळात तिने आत्मविश्वास आणि स्वावलंबन जपत आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली.

मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर कल्याणीने प्रथम कॅनल इन्स्पेक्टर म्हणून काम करत प्रशासनातील अनुभव घेतला. त्यानंतर महसूल सहायक अधिकारी पदावर कार्य करताना तिने प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा ठसा उमटवला. तिच्या जिद्द व चिकाटीमुळे तिला हे यश मिळाले असल्याचे सांगितले. या यशाबद्दल तिचे ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

आज मिळालेल्या यशाचा आनंद आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. पुढेही प्रामाणिकपणे काम करत समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. ग्रामीण भागातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, असा माझा संदेश आहे."
-कल्याणी घोगरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT