Maratha reservation protest manoj Jarange Patil clarification
वडीगोद्री : आम्ही कधी चर्चेला नाही म्हणालो नाही. विखे-पाटील यांचा निरोप आला होता. त्यांना मी सांगितलं आहे कुठेही चर्चेला या; पण मी बंद खोलीत चर्चेला बसणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या वतीने विखे यांचं शिष्टमंडळ शिवनेरीवर येणार आहे;मग बोलू कुणीही मंत्री येवोत कुणालाही त्रास द्यायचा नाही, असे मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईला निघण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
यावेळी जरांगे -पाटील म्हणो की, काल रात्री मंत्री रात्री राधाकृष्ण विखे यांचा परत फोन आला होता. मुख्यमंत्र्यांच्या वतीने विखे शिवनेरीला चर्चेला येणार आहेत. सरकारला आणि फडणवीस यांना त्यांची चूक झाकायची आहे म्हणून ते देव देवतांना पुढे करत आहे. देवतांच्या आडून गरिबांवर अन्याय सहन करणार नाही. न्यायालयाने परवानगीसाठी अर्ज करायचे सांगीतले आहे ते आपण करत आहोत. सरकारने नवीन कायदा 2 ते 4 दिवसांत आणला आहे.हा कायदा अचानक आणला.आणि या कायद्याची परवानगी तुम्ही घेतली नाही असं हे सांगत आहे. आम्ही काय दंगली करायला मुंबईत येतोय का.? असा सवाल करत सरकार म्हणून तुम्ही हिंदू विरोधी काम का करत आहे याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल गणेशोत्सवाला आम्ही गालबोट लावू शकत नाही, असेही जरांगे म्हणाले.
सगळ्या डावांचा उपयोग करावा,संयम ढळू देऊ नका.शांततेत लढाई जिंका. डोक्याने लढाई जिंकायची आहे.शांततेचा संघर्ष सुरू ठेवा.देव-देवतांच्या नावाखाली आपल्याला आडवल जात आहे.गणेशोत्सवाच्या नावाखाली आपल्याला आडवल जात आहे. हिंदू आणि धर्माच्या नावाखाली ज्यांना हिंराजकारण करायच आहे ते खऱ्या हिंदूंना आडवत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी या या प्रश्नाचं उत्तर द्यावे.तुमचे मुख्यमंत्री जाणून बुजून हिंदूंना त्रास देण्यासाठी तुम्ही बसवले आहे का, असा सवाल करत राज्य सरकारने मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा, सातारा,हैद्राबाद, बोंबे गॅझेट लागू करा, सर्व आंदोलकांवरील सगळ्या केसेस मागे घ्या, आत्महत्या केलेल्या कुटुंबातील सदस्यांना मदत करा, कुणबी प्रमाणपत्र द्या,व्हॅलीडीटी द्या या मागण्यांचाही त्यांनी पुन्नरुच्चार केला.
न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. अटी शर्थीचे पालन करू. आझाद मैदानाs शांततेत आंदोलन होईल पुढचं पुढं बघू न्यायालय आपल्याला न्याय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सरकार अजून किती बळी घेणार आहे. लातूरमध्ये एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला.वाटल्यास मुंबईत आल्यावर मला गोळ्या घाला.फडणवीस आमच्या सगळ्या आत्महत्या तुमच्यामुळे झाल्या आहेत. मी असेपर्यंत आत्महत्या करू नका.मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केला, असे ऐकायला मिळायला नाही पाहिजे. जे सगळे आंदोलनात येणार आहेत एकानेही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही. ही आरपारची लढाई आहे.शेवटची लढाई आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.