जाफराबाद : मृतदेह अशा प्रकारे नाल्यातून ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने स्‍मशानभूमीपर्यंत नेण्यात आला.  (छाया : मुकेश भारद्वाज)
जालना

Jalna News : अखेरचा प्रवासही खडतर; चिखल तुडवीत निघते अंत्‍ययात्रा!

रस्ता नसल्याने मृतदेह नेला नाल्यातून; जानेफळमधील विदारक चित्र, विकासदाव्यांना तडा

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील जानेफळ गावात आजही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगल्या रस्‍त्याअभावी मृतदेहाची अवहेलना सोसावी लागत आहे. अखेर प्रवास तरी सुखाचा व्‍हावा, अशी अपेक्षा असताना मात्र, जानेफळ गावातील स्‍मशानभूमीचा रस्ता खडतर, चिखल तुडवीत जावे लागत आहे.

दरम्यान, जानेफळ येथील ६५ वर्षीय वृध्दा केसरबाई शंकर तायडे यांचे ९ रोजी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर स्‍थानिक स्‍मशानभूमीत अंत्यसंस्‍कार करण्यासाठी नीट रस्ता नसल्यामुळे त्यांचे पार्थिव ट्रॅक्टरच्या सहाय्याने नाल्यातून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात रस्‍त्यात चिखल साचतो. यामुळे मृतदेहाला खांद्यावर नेण्याऐवजी ट्रॅक्‍टरवर नेण्याची वेळ ग्रामस्‍थांवर आली.

प्रशासन अपयशी

  1. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पक्क्या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

  2. परिणामी, प्रत्येक अंत्यविधीवेळी गावकऱ्यांना अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शाश्वत विकासाची ध्येय साध्य करत असतानाही मृतदेहाच्या वाटेला येणारी अवहेलना न सोसावणारी आहे.

जाफराबाद : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील जानेफळ गावात आजही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी चांगल्या रस्‍त्याअभावी मृतदेहाची अवहेलना सोसावी लागत आहे. अखेर प्रवास तरी सुखाचा व्‍हावा, अशी अपेक्षा असताना मात्र, जानेफळ गावातील स्‍मशानभूमीचा रस्ता खडतर, चिखल तुडवीत जावे लागत आहे. दरम्यान, जानेफळ येथील ६५ वर्षीय वृध्दा केसरबाई शंकर तायडे यांचे ९ रोजी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर स्‍थानिक स्‍मशानभूमीत अंत्यसंस्‍कार करण्यासाठी नीट रस्ता नसल्यामुळे त्यांचे पार्थिव ट्रॅक्टरच्या सहाय्याने नाल्यातून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात रस्‍त्यात चिखल साचतो. यामुळे मृतदेहाला खांद्यावर नेण्याऐवजी ट्रॅक्‍टरवर नेण्याची वेळ ग्रामस्‍थांवर आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT