भोकरदन : तालुक्यातील फत्तेपुर येथील शिवानी गिरी (वय 18) हिने जीवन संपवले. रेखा दीपक चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल बल्लू आगाम शीला बल्लू आगाम अर्जुन बल्लू आगाम गोपाल व ज्ञानेश्वर सर्व राहणार फत्तेपूर दत्तनगर या पाच जणांविरुद्ध जीवन संपवण्यास प्रवृत्त केले म्हणून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, आरोपी विशाल आघाम व मृत शिवानी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. नुकतेच शिवानीचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्याने याचा राग मनात धरून विशाल याने शिवानीला जीवे मारण्याची व समाजामध्ये बदनामी करण्याची धमकी दिली होती.
इतर आरोपींनीही या प्रकरणात मानसिक त्रास दिल्याने व धमक्या दिल्याने शिवानी हिने आरोपी विशाल आघाव यांच्या घरी जाऊन दि. 20 रोजी जीवन संपवले. प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे करीत आहेत.