टेंभुर्णी : टेंभुर्णी ते पापळ रस्त्यांची झालेली दुरावस्था 
जालना

Jalna|खराब रस्त्यामुळे प्रसूती रस्त्यावरच

Jalna road delivery-टेंभुर्णी येथील प्रकार, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णालयात पोहचण्यास झाला उशीर

पुढारी वृत्तसेवा

रावसाहेब अंभोर

तालुक्यातील टेंभुर्णी-पापळा मार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णालयात पोहोचण्याआधीच एका गरोदर महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या आणि रस्त्यावरच तिने बाळाला जन्म दिला. ही घटना सोमवारी (दि.६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहे. पापळा येथील एक बत्तीस वर्षीय महिलेला प्रसववेदना सुरू झाल्याने तिला एका अॉटोरिक्षा घेऊन नातेवाईक पापळा-टेंभुर्णी या मार्गान रुग्णालयात निघाले होते.

काही अंतरावर गेल्यावर त्या महिलेची रस्त्याच प्रसूती झाली. यावेळी भाजपचे ज्ञानेश्वर पवार यांनी खासगी वाहन बोलवून त्या महिलेला टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान दोघांची प्रकृती स्थिर आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे हा रस्ता जीवघेणा ठरत आहे.

टेंभुर्णी ते पापळ हा रस्ता परिसरातील ५ ते ७ गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. लघुपाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाअभावी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. रीतसर परवानगीगावकऱ्यांनी ग्रामपंचायत मार्फत ठराव देऊनसुध्दा आडकाठी रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होते. रुग्णवाहिका आणि शालेय बसनाही या रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे.

रुग्ण, शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरिष्ठांनी या लक्ष घालून रखडलेले काम सुरू करण्याची गरज आहे. दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे.. नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राजु डाहाळे, मुरलीधर जाधव, नामदेव कुहीर, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर बोंबडे, ज्ञानेश्वर मोरे, गणेश खडसे, ज्ञानेश्वर इंगळे, गजानन गायकवाड, पंडित जाधव, दादासाहेब जाधव, अनिल ससाणे, परमेश्वर मोरे, परमेश्वर जाधव, विष्णू जाधव, विजय मोरे, एकनाथ मोरे यांनी दिला आहे.

साडेचार कोटींचा निधी

पापळ - टेंभुर्णी या रस्त्याच्या कामासाठी आमदार संतोष दानवे यांनी विकास निधीतून साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. टेंभुर्णीपासून काम सुरू झाले. परंतु लघुपाटबंधारे विभागाचे पाट व दोन्ही बाजूला ३५ फूट जमीन असल्याने संबंधित विभागाकडे रीतसर परवानगी मागविण्यात आली. परंतु अद्यापही परवानी दिले नसल्याने रस्त्यांचे काम रखडले आहे

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गरोदर महिलेला रुग्णालयास जाण्यास उशीर झाल्याने रस्त्यावर प्रसूती झाली आहे. हा गंभीर प्रकार आहे. रस्त्यामध्ये पाट येत असल्याने रस्त्यांच्या कामासाठी लघुपाटबंधारे विभागाने परवानी न दिल्याने रस्त्यांचे काम रखडले आहे. कामासाठी परवानी न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून रस्त्यांचे काम तातडीने करावे.

- ज्ञानेश्वर पवार, भाजप नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT